रविवार म्हंटलं की सुट्टीचा वार. निवांतपणे उठा, अख्खा दिवस आपलाच असतो ना. मग अशावेळी एखादा बेत तर हवाच असतो, रोज रोज चपाती - भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो. आणि काही खवय्यांसाठी तर रविवार म्हणजे मांसाहाराचा दिवस. मग काय दिवसभराचे बेत आधिच ठरवून टाकलेले असतात. तर रविवारचा बेत घेऊन आज आपण खवय्यांसाठी चिकन बिर्याणी करणार आहोत.
चला तर मग रविवार आहे म्हणून लोळत पडू नका, तयारीला लागा.
चिकन बिर्याणी
साहित्य :
७०० ग्रॅम चिकन( पाऊन किलो), १ किलो बिर्याणी राईस, १/२ किलो कांदे, ४ टोमॅटो, ५/६ चमचे आलं-लसूण पेस्ट, ४/५ चमचे पुदिना - कोथंबीर पेस्ट, ४ चमचे बिर्याणी मसाला, २ चमचे कश्मिरी लाल मिरची पावडर, १ लिंबाचा रस, २ चमचे दही, १/२ हळद, मीठ चवीनुसार, ४/५ चमचे तेल
अख्खा मसाला :
२ तमाल पत्र, ४ लवंग, ४ काळी मिरी, १ चक्रीफूल, २/३ हिरवी वेलची, १ चमचा जिरे, १ दालचीनी
चिकन मॅरीनेट मसाला :
२ चमचे आलं-लसूण पेस्ट, १ चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर, २ चमचे पुदिना - कोथंबीर पेस्ट, २ चमचे दही,
१ चमचा तंदूर मसाला, १/२ चमचा मीठ
कृती :
१) प्रथम चिकन स्वच्छ करून धुऊन त्याला चिकन मॅरीनेट मसाला लावून १/२ तास ठेवून द्या.
२) बिर्याणी तांदूळ स्वच्छ धुऊन कुकरच्या भांड्यामध्ये विभागून घ्यावा. कमी पाणी घालून व त्यामध्ये प्रत्येकी १ चमचा तेल घालून कुकरमध्ये ३ शिटी देवुन शिजवून घ्यावा. ( मी अर्धवट कच्चा शिजवून घेत नाही)
३) शिजवलेला भात मोकळा करून थंड करून घ्यावा.
४) १ किलो बिर्याणी करता येईल असे भांड घेऊन त्यात तेल
घालून अख्खा मसाला फोडणीला घालावे.
५) मसाले तेलात चांगले परतून त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यावे. त्यातच काही पुदिन्याची पाने घालावी.
६) आता त्यामध्ये कोथिंबीर-पुदिना-आलं-लसून पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतवून घ्यावे. नंतर टोमॅटो प्युरी घालून त्याला सुद्धा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यावे.
७) त्यानंतर बिर्याणी मसाला, कश्मिरी लाल मिरची पावडर, हळद, मीठ, लिंबू रस, व दहि एक एक करून घालून तेल सुटेपर्यंत परतवून घ्यावे.
८) आता मॅरीनेट केलेले चिकनचे तुकडे या मसाल्यात घालून चांगले एकजीव करून प्लेट झाकून ठेवून शिजवण्यासाठी द्यावे.
९) चिकन अर्धवट शिजवून घेऊन त्यामध्ये तयार करून घेतलेला मोकळया भाताचे लेयर करून घ्यावे.
१०) भाताचे लेयर करत असताना पुदिन्याची पाने, तळलेला कांदा आणि केशरी रंग असा लेयर द्यावा.(सोबत दिलेल्या व्हिडिओ मध्ये लेयर कसा केला आहे ते पहायला मिळेल.)
११) बिर्याणीला लेयर दिल्यानंतर ते भांडे एका तव्यावर ठेवून मंद आचेवर बिर्याणी शिजू द्यावी.
आजचा रविवार फक्त बिर्याणीच्या घमघमाटाने सर्वांपर्यंत पोहचला. मग फक्त रेसिपी वाचतच बसणार आहात का चला लागा कामाला, बिर्याणी करायची आहे ना फटाफट चला तर मग........



Wahhh Tai
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteBiryanila dam kiti minute dyaycha.
ReplyDeleteRecipe khup chan sangitli aahe n thanks
ReplyDelete