पावसाची सुरवात चांगलीच झाली आहे आता, त्यामुळे कांदा भजी, बटाटा भजीची प्लेट, वाफळता चहा, गरमागरम कॉफी यांची परत एकदा मेजवानी सुरु होईल. म्हणून आज थोड्या वेगळ्या प्रकारचे भजी आणि अगदी झटपट, सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत.
कांद्याचे दर एकदम कडाडले की, कांदा भजी कराण्याचा विचार सुद्धा मनात आणू नये, तेव्हा आपल्याला या भजांचा पर्याय उपलब्ध आहे. मी जेव्हा हे भजी केले तेव्हा मलाच काय, घरात सर्वांनाच ते खुपच आवडले. सगळे नुसते भाज्यांवर ताव मारत बसले.
दही-मैद्याचे पकोडे :
साहित्य :
१/२ वाटी मैदा, १ वाटी दही, १ कांदा बारीक चिरुन ( आवश्यक असल्यास. नाही वापरला तरी चालेल.) १ चमचा जीरे, ४ हिरव्या मिरच्या, कोथींबीर, १/२ चिमूट खायचा सोडा, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल
कृती :
१) मैदा चाळून त्यामध्ये दही, जीरे, कांदा, हिरव्या मिरच्या, कोथींबीर बारीक चिरून घालावे.
२) खायचा सोडा व मीठ घालून पीठ भजीप्रमाणे एकजीव करून घ्यावे.
३) तेलामध्ये छोटे छोटे भजीचे गोळे सोडावे व लालसर रंगावर तळून घ्यावे.
४) चिंचेच्या चटणीबरोबर दही-मैद्याचे पकोडे खूपच मस्त लागतात.
गंमत आहे ना, इतक्यात भजी तयार झाले. मस्त पावसाच्या सरींचा आणि वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद 'रूचीपर्णा' वर नक्कीच घ्या.



Mast
ReplyDeleteYummy snacks in rainy season 😋
ReplyDeleteSupb
ReplyDeleteएकदम जबरदस्त आणी सोपी रेसीपी टेस्ट पण मस्त झट की पट
ReplyDeleteएकदम जबरदस्त आणी सोपी रेसीपी टेस्ट पण मस्त झट की पट
ReplyDeleteआजच केली मस्तच, सर्वांना आवडली धन्यवाद अपर्णा
ReplyDelete