Chili Chicken
बुधवारची मेजवाणी म्हणून थोड हल्क-फुल्क स्नॅक खाण्याची जीभेची इच्छा झाली. बुधवार म्हंटल तर आमचा नाॅनवेजचा वार. मग झटपट स्नॅक करायचं काय? हा प्रश्न पडला. ......मग हा बेत ठरला, चिली चिकनचा. वेळ न घालवता बनवायला घेवूया फटाफट....चला तर मग रेसीपी पाहूयात.
चिली चिकन
साहित्य :
१/२ कि. बोनलेस चिकन, २ चमचे आलं, २ चमचे लसूण (आलं- लसूण अगदी बारीक चिरून घ्यावे), २ हिरवी मिरची, १ चमचा काश्मिरी लाल मिर्च पावडर, १/२ चमचा ब्लॅक पेपर पावडर, १ अंडे, २ चमचे मैदा, ३ चमचे काॅर्न फ्लोअर, २ कांदे, २ सिमला मिरची ( कांदा व सिमला मिरची चौकोनी आकारामध्ये कापून घ्यावे ), २ चमचे टोमॅटो सॉस, २ चमचे सोया सॉस, १ चमचा व्हिनेगर, कॉर्नफ्लोअर, तळण्यासाठी तेल, मीठ, चिमूटभर साखर, कांदा पात किंवा कोथंबीर सजावटीसाठी
कृती :
१) चिकनला ब्लॅक पेपर पावडर, मीठ, मैदा, काॅर्न फ्लोअर, अंडे घालून मिश्रण एकजीव करून १ तास मॅरीनेशनसाठी ठेवून द्यावे.
२) नंतर मॅरीनेशन केलेले चिकन तेलामध्ये High flame वर तळून घ्यावे.
३) आता एक पॅनमध्ये तेल गरम करून आलं- लसूण, हिरवी मिरची, सिमला मिर्ची व कांदा High flame वर फ्राय करून घ्यावे.
४) त्यामध्ये चिकनचे पीसेस परतवून घ्यावे.
५) आता सोया सॉस, टोमॅटो साॅस घाला व लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर घालून पॅनला टाॅस करा. (परतवून घ्यावे)
६) एका वाटीत थोडे पाणी घ्या, त्यात १/२ चमचा कॉर्नफ्लोर घाला व ते पाणी पॅन मध्ये टाका त्यामुळे ग्रेव्ही घट्ट होईल.
७) कोथंबीर अथवा कांदा पात वरून गार्निश करा. चिली चिकन तयार आहे.