Thursday, December 31, 2020

Amritsari Pindi Chole - Bhature

अमृतसरी पींडी छोले



छोले मसाला : 

१ चमचा जिरे, १ च. धणे, ४ मिरे, ४ लवंग, १ मसाला वेलची, १ स्टार फुल, २ वेलची,१ तुकडा दालचिनी, २ तमालपत्र, १ लाल मिरची,१ च. आमचूर पावडर, १/२ च. हळद, १ च. गरम मसाला पावडर, मीठ चवीनुसार

फोडणीसाठी मसाला :

चमचे पुदीना - ग्रीन चटणी, १ वाटी कोथिंबीर,४ मिरची १ तुकडा आलं,१ चमचा डाळिंब दाणे, १ चमचा चिंच चटणी, 

१/२ चमचा बटर, १ च. जिरे, हिंग, कोथिंबीर, २ बटाटे 

कृती : 

१. प्रथम छोले उघडून घेताना त्यामध्ये १ चमचा चहा पावडर, ४ मिरी, ४ लवंगा, २ वेलची घालून त्याची एक पुरचुंडी करून ती छोले शिजवताना त्यामध्ये घालणे. 

२. एक वाटी  छोले २ ते ३ तास भिजवून त्यामध्ये १ पेला पाणी आणि पुरचुंडी घालून तीन शेट्टी देऊन छोले मऊ शिजवून घ्यावे.

३. फोडणीसाठी बटर १ चमचा घालून जिरे फोडणी देऊन ग्रीन वाटण घालून परतवून घेणे,  त्यानंतर तयार केलेला छोले मसाला ४ चमचे घालून परतवून घेणे.

४. आता त्यामध्ये छोले टाकून १/२ पेला पाणी घालून चांगले शिजवून घ्यावे.

५. छोले शिजवताना वरतून तीन ते चार मिरच्या व आल्याचे पातळ लांबट काप घालून चांगले एकजीव करावे.

६. एका साईडला बटाट्याचे समान काप करून तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणे व त्यावर छोले मसाला व मीठ घालुन ठेवून द्यावे.

भटूरे :

साहित्य : १/२ वाटी रवा, १ चमचा तेल,१/२ वाटी दही, १/३ सोडा, २ पेले गव्हाचे पीठ, तळण्यासाठी तेल 

१) २ पेले गव्हाचे पीठ घेऊन त्यात मीठ, सोडा, तेल आणि दही घालून कणिक मऊ अशी मळून घ्यावी.

२) १५ ते २० मिनिटे चांगली मऊसर होण्यासाठी ठेवून द्यावी.

३) आता भटूरे लांबट आकारात लाटून तळून घ्यावे. 

     छोले - भटूरे सर्व्ह करताना थोडे छोले व त्यावर तळलेले मसाला बटाटे घालून गरमागरम भटूरे सोबत खायला द्यावे.




Tuesday, December 22, 2020

Plum Cake

 ख्रिसमस स्पेशल : प्लम केक

नाताळ म्हंटलं की आपल्या समोर चित्र उभे राहते ते म्हणजे सांताक्लाॅज, खूप सारे गिफ्ट्स, आणि खाऊ.  सुंदर अशा दिव्यांच्या माळांची झगमगाट, डायनिंग टेबल वर विविध प्रकारचे केक, डोनट्स, चॉकलेट्स, बियर, वाइन, रम असा लवाजमा.

ख्रिसमस जवळ आलाच आहे त्यानिमित्ताने आज आपण ख्रिसमस स्पेशल प्लम/रम केक करणार आहोत. आपण या केकमध्ये काही रम वगैरे वापरणार नाही आहे, त्या ऐवजी अॅपी ज्यूस वापरणार आहोत. चला तर मग सुरु करुयात प्लम केकची तयारी..... 

प्लम केक



साहित्य :

ड्रायफ्रूट्स : काजू, बदाम, पिस्ता, काळे मनुके, रासबेरी, ब्लूबेरी (प्रत्येकी २ चमचे बारीक तुकडे करून) टूटीफ्रूटी, व अॅपी ज्यूस 

बटर १०० ग्रॅम, मैदा १/२ किलो, अंडी ४, तेल १/३ कप, व्हॅनिला इसेन्स २ चमचे, साखर १/२ वाटी, बेकिंग पावडर दीड चमचा, खायचा सोडा १/२ चमचा,

कॅरमलसाठी : २ चमचे साखर 

कृती :

१) प्रथम अॅपी ज्यूसमध्ये सर्व ड्रायफ्रूट्स २० भिजवून ठेवणे. ( अॅपी ज्यूस १/२ पॅकेट किंवा बॉटल असेल तर एक वाटी ज्यूस घेणे)

 २) मैदा अर्धी वाटी घेऊन त्यामध्ये बेकिंग पावडर व सोडा घालून दोन ते तीन वेळा सर्व साहित्य एकत्र करून चाळून घेणे. 

 ३) आता कॅरमलसाठी दोन चमचे साखर मंद आचेवर विरघळून त्याचे कॅरमल करून घ्यावे आणि दोन चमचे पाणी घालून कॅरमल पातळ करून त्याचे लिक्विड करून घ्यावे.  

४) ४ अंडी फोडून त्यामध्ये १/२ वाटी साखर घालून फेटून घेणे. त्यासाठी डबल बाॅयलर पद्धत वापरणे. गॅसवर कढईत पाणी ठेवून ते गरम करून घेणे व त्यावर अंड्याचे भांडे ठेवून अंडी फेटून घेणे. (व्हिडिओमध्ये दाखवले आहे.)

५) अंडी फेटून डबल झाले पाहिजे.(त्याचा फोम झाला पाहिजे.) आता त्यामध्ये बटर टाकुन फेटावे, व नंतर तेल टाकून फेटावे.

६) फेटलेल्या अंड्यामध्ये आता भिजवलेले ड्रायफ्रूट्स घालून मिश्रण एक करून त्यामध्ये कॅरमल लिक्विड ओतून मिश्रण एकत्र करावे.

७) मैदा २ विभागात करावा. हलक्या हाताने फेटलेल्या अंड्यामध्ये दोन वेळा विभागून घालून फेटून घ्यावे.

८) इसेन्स घालून मिश्रण व्यवस्थित अगदी हलक्या हाताने एकत्र करावे.

९) केकच्या भांड्याला बटर लावून केक बॅटर त्यामध्ये ओतावे. व केक वरतून काजू, काळे मणूके लावून भांडे २/३ वेळा टॅप करावे. 

१०) कूकर आधि १० मिनिटे गरम करायला ठेवावा. त्याची वायर काढावी व शीटी असू द्यावी. कुकरच्या तळाशी कुकरचे एक भांडे उपडे ठेवावे व त्यावर केकचे बेटर असलेले भांडे ठेवून झाकण लावून मिडीयम गॅसवर केक ३० ते ३५ मिनिटे बेक करावा. पंधरा मिनिटांनी कुकरचे झाकण उघडून केक चेक करावा. (सुरीने किंवा टूथपीकने केक बेक झाला आहे की नाही पहावा.) 



Thursday, December 17, 2020

Badam Chikki/Almond Sweet Candy

बदाम चिक्की       




   
थंडी जसजशी वाढु लागली की काही पदार्थ आवर्जून केले जातात, जसे की डिंक लाडू, पौष्टिक लाडू, वगैरे.... 
मी सुद्धा असे काही पदार्थ बनवतेच, पण आजून फार अशी थंडी पडली नाही म्हणून घरी दिवाळी साठी आणलेल्या सुका मेवाचे काही तरी करुयात असा विचार केला आणि लगेच रेसिपी करायला घेतली. 

बदाम चिक्की

साहित्य :
१ वाटी बदाम 
१ वाटी साखर 
१ चमचा तूप 

कृती :
१) प्रथम बदामाचे दोन तुकडे करून घ्यावे.
२) नंतर ते मंद आचेवर भाजून घ्यावे.
३) एका कढईत साखर घालून ती वीरघळेपर्यंत सतत ढवळत रहावे. 
४) आता त्यामध्ये तूप घालून मिश्रण एकजीव करावे. 
५) एकतारी पाक करून घ्यावा.
६) आता त्यामध्ये बदाम काप घालून मिश्रण एकत्र करून घ्यावे. 
७) लगेचच एका तूप लावून घेतलेल्या पाटावर हे मिश्रण ओतून हवा तसा  शेप द्यावा.
८) चिक्की थोडी थंड झाल्यावर त्याचे काप करावे. 
      



 

Sunday, December 13, 2020

मखाना खीर (Winter Special)

नमस्कार, 

आज खूपच दिवसांनी 'रूचीपर्णा', आपल्या सर्वांनसाठी पुन्हा एकदा नवनवीन रेसिपी घेऊन येत आहे. 

कोरोना बद्दल आपण खुप बोलत असलो तरी, ती वेळ प्रत्यक्ष  आपण अनुभव आल्यानंतरच कळते.  असो आपण परत आपल्या रूचीपर्णा किचन कडे वळूया. 

थोडी फार हलकीशी थंडी जाणवू लागली आहे, म्हणून विचार केला की आता काही थंडीसाठी गरमागरम आणि हेल्दी अशा रेसिपीने सुरवात करुयात.. ...

चला तर मग आज आपल्या किचनमध्ये हेल्दी आणि झटपट अशी रेसिपी बनवायला. 

*मखाना खीर*



* साहित्य *

२ कप मखाना

२ कप दुध

१/२ कप साखर 

२ टेबल स्पून तूप

२ टेबल स्पून सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ता, चारोळी) 

५/६ काड्या केशर

* कृती *

१) गॅसवर एका पॅन मध्ये दोन टेबल स्पून तूप घेऊन ते गरम झाल्यावर त्यात मखाने पाच मिनिट मध्यम आचेवर परतून घ्या.

२) सुका मेवा पॅन मध्ये तुपावर मध्यम आचेवर परतून घ्या.

३) परतलेले मखान्यातील निम्मे मखाने मिक्सर मधून चुरा करून घ्या.

४) गॅसवर पॅनमध्ये दुध गरम करायला ठेवा. दुधाला उकळी आल्यावर त्यात चुरा केलेले मखाने व आख्खे मखाने घालून दहा मिनिट सारखे ढवळत रहा.

५) त्यात साखर घाला. सुका मेवा व केशर घालून सर्व एकत्र करून दहा मिनिट ढवळत रहा. मखाना खीर तयार