Tuesday, November 15, 2022

पारंपारिक पद्धतीचे चोंगे

 



पारंपारिक पद्धतीचे चोंगे 


रूचीपर्णा रेसिपी 


साहित्य : 

गव्हाचे पीठ तीन वाट्या, गुळ 300 ग्रॅम, मसाल्यासाठी किसलेले खोबरे, खसखस, वेलची पूड चवीनुसार मीठ

कृती :

• गुळाचा पाक करण्यासाठी साधारण एक पेला पाणी घालून पाक करावा .पाक चिकट हवा एक तारी पाक असतो त्यापेक्षा थोडा दाट. जास्त घट्ट नको. 

• खोबरे बारीक किसून घ्यावे. खसखस हलकीशी भाजून घ्यावी, वेलची मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी. सर्व मसाला बाऊल मध्ये एकत्र करून घ्यावा. 

• चपातीच्या पिठासारखे कणिक मीठ घालून चांगले मळावे. 

• फोटो मध्ये दाखविल्या प्रमाणे चोंगे पाटावर एक एक पोळी लाटून ती पोळी दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावी. 

• आता गरम गरम एकेक चोंगा एका प्लेट मध्ये घेऊन त्यावर गुळाचा पाक टाकून खसखस आणि खोबऱ्याचा कीस टाकून वरतून थोडी वेलची पावडर घालून सर्व मसाला घालून घ्यावे. (प्रत्येवेळी एकेक चोंगे भाजून ही कृती करावी.)

• आवडत असल्यास तुप गरम करून वरून तुपाची धार सोडावी. 

• पाक गरम असतानाच सर्व चोंगे तयार करून थोडा वेळ पाकात मुरायला ठेवावे.

• गरमागरम रसरशीत मुरलेले चोंगे खायला तयार.

Tuesday, August 30, 2022

Rasmalai Modak



 Rasmalai 

 रसमलाई मोदक

साहित्य :

अर्धा लिटर दूध, 1/3 कप मिल्क पावडर, 3 चमचे साखर, 1 चमचा व्हिनेगर, 2 रसगुल्ले, थोड्या गुलाब पाकळ्या, 1 चमचा पिस्त्याचे काप, 1 चमचा विलायची पावडर, 2 चमचे केशर दूध, तीन ते चार थेंब केशर कलर

कृती:

1. दूध उकळायला ठेवा व त्यात व्हिनेगर टाकून त्याचे पनीर करून गाळून घ्यावे. 



2. पनीरचं सगळं पाणी काढून, एका पॅन मध्ये पनीर, मिल्क पावडर व साखर एकत्र करून शिजवून घ्यावे. 

3. मिश्रण थोडं घट्ट झाले की त्यात केशर, थोडा केशर कलर, थोड दूध घालावे. थोड्या वेळ परतून गॅस बंद करावा.



4. तयार मिश्रणात 2 रसगुल्ले तुकडे करून (हवे असल्यास, मी वापरले आहेत./optional) गुलाब पाकळ्या व पिस्ता काप घालावे.

5. मिश्रण छान मळून घ्यावे. मोदकाच्या साच्यात घालून त्याचे मोदक करून घ्यावे.



6. बाप्पासाठी छान घरच्या घरी रसमलाई मोदक प्रसाद तयार.






Monday, August 29, 2022

Ganpati Special: Rasmalai Modak

 Next recipe.....




Be continued with RuchiParna Kitchen .......

Stay with us..........


Rasmalai Modak 

Saturday, August 27, 2022

Spiral French Fries 🌀

Spiral French Fries 🌀



कुरकुरीत स्पायरल फ्रेंच फ्राईजसाठी

साहित्य :

3 उकडलेले बटाटे, ⅓ कप कॉर्न फ्लोअर,

¼ कप दूध, ½ टीस्पून मीठ (चवीनुसार),

1 अंडे


कृती 

1. एका भांड्यात एक अंडे चांगले फेटून घ्यावे.

2. दुसऱ्या भांडयात उकडलेले बटाटे घेवून चांगले मॅश करावे. 

3. त्यामध्ये कॉर्नफ्लोअर, दूध, मीठ, अंडी घालून मिक्स करावे.

4. पाइपिंग बॅग किंवा प्लास्टिक पिशवी किंवा Ziploc पिशवीमध्ये बटाट्याचे मिश्रणाने भरुन घ्यावे. 

5. त्याच्या गोल चकलीच्या आकारात स्पयारल फ्राईज पाडून घ्यावे.

6. तळण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर, दोन्हीं बाजूने फ्राईज कुरकुरीत आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्यवेत. 

7. केचपसोबत गरमागरम सर्व्ह करा आणि मजा घ्या.

Tuesday, August 16, 2022

चहा मसाला ☕

 







    


चहा मसाला 

साहित्य :

 ३½" दालचिनी, १ मसाला वेलची, ३५ ते ४० हिरवी वेलची, १ जावेत्री, १ जायफळ, १ चक्रीफूल, १ चमचा काळीमीरी, १ चमचा लवंग, एक छोटी जुडी सुकलेली गवती चहाची पाने, ५० ग्रॅम सुंठ, ३ चमचे बडीशेप.

कृती

• प्रथम गरम पॅनमध्ये मंद आचेवर गवती चहा सोडून बाकी सर्व मसाले ३ मिनिटे भाजून घ्या. 

• त्यानंतर यात गवती चहा घालून हलका परतावा. ( गवती चहा फक्त शेक लागे पर्यंत भाजावा. ) 

• आता सर्व मसाले खलबत्त्यात कुटून घ्यावे आणि नंतर मिक्सरला बारीक वाटून घ्यावे. 

• तयार मसाला हवाबंद बरणीत भरून ठेवावा. हा मसाला ५ महिने आरामात टिकतो.

• चहा बनवताना थोडी तुळस पाने सुद्धा धुवून टाकल्यास अजून छान चव येईल.


(मार्केट मध्ये येणाऱ्या चहा मसाला पेक्षा घरगुती चहा मसाला सर्वात उत्तम.)

Monday, August 8, 2022

तांदळाची खीर/ मुगोरी (थोडी वेगळी)

 



गणपती बाप्पा विशेष रेसिपी 


तांदळाची खीर/ मुगोरी (थोडी वेगळी)


साहित्य :

१½ कप गूळ, १ कप तांदळाचे पीठ, १½ तांदळाचे पीठ घोळ बनवण्यासाठी, ४ चमचे ओल्या नारळाचा खीस, १ चमचा वेलदोड्याची पूड, ½ चमचा जायफळाची पूड, उकड तयार करण्यासाठी २/३ कप पाणी आणि खीर बनवण्यासाठी २½ ग्लास पाणी, १ चमचा चारोळी, ३ चमचे साजूक तूप आणि एक कप गरम दूध, किसमिस, काजू, केसर 


कृती:

• प्रथम एका छोट्या पातेल्यात तांदळाची उकड काढण्यासाठी २/३ कप पाणी उकळून घ्यावे. 

• पाणी उकळल्यावर त्यात पीठ घालून भाकरीसारखी उकड काढावी.

• त्यानंतर साध्या पाण्याचा वापर करून उकड गरम असतानाच मळून घ्यावी आणि त्याचे अगदी छोटे मण्यासाखे गोळे तयार करावेत. 

• आता पातेल्यात खिरीसाठी पाणी उकळून घ्यावे आणि त्यात गुळ वितळून घ्यावा. 

• गुळ वितळल्यानंतर यात तांदळाच्या पिठाचा घोळ घालून एकजीव करा आणि नंतर यात ओल्या नारळाचा खीस, चारोळी, वेलदोडे आणि जायफळ पावडर इत्यादी घालून एकजीव करावे. 

• आता यात मुगोरी म्हणजेच तांदळाच्या पिठाचे छोटे छोटे गोळे घालावे आणि ५ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावी. 

• आता हि खीर मध्यम थंड करून यात गरम दूध घालावे आणि एकजीव करून गरमागरम मुगोरीचा आस्वाद घ्यावा. 

• सजावटीसाठी वरतून तळलेले काजू, किसमिस आणि केसर घालावे.

• (मुगोरी गरम असताना यात गरम दूध जर घातले तर गुळामुळे दूध फाटून जाईल. )


 

Sunday, August 7, 2022

गव्हाची खीर

 गणपती बाप्पा विशेष रेसिपी 



गव्हाची खीर 


साहित्य:

• १०० ग्रॅम खपली गहू (हे गहू खिरीचे म्हणून वेगळे असतात. ते थोडे महागही असतात. मुंबईत ते मिळत नाहीत. )

• ५० ग्रॅम गूळ, भाजकी खिरीची शेव, चार पाच चमचे तूप 

• सुक्या किंवा ओल्या खोबर्‍याचा तुकडा, (मी ओल्या खोबर्‍याचा तुकडा वापरते),

• सुंठ, वेलची, मनुके, काजू, बदाम, पिस्ता चारोळे                           

(मुले खिरीमध्ये ड्रायफ्रूट असतील तर जास्त आवडीने खातात.)

कृती:

• खपली गहू आदल्या रात्री नीट धुवून भिजत ठेवावेत. 

• सकाळी कुकरला चांगल्या तीन-चार शिट्ट्या काढून शिजवून घ्यावेत. (हे गहू कडक असतात. त्यामुळे शिजायला वेळ लागतो. ) 

• कुकर उघडून त्यातच किंवा साहित्य दुसर्‍या भांड्यात घेऊन त्यात गूळ घालावा. हा गूळ चांगला घोटवून घ्यावा. 

• सुंठ व वेलची पावडर करून घालावी.

• ओला नारळचे बारीक काप आणि काजू, बदाम तुपात गुलाबी रंगावर तळून घ्यावेत.

• बारीक शेवाळया सुद्धा तुपात भाजून घ्याव्या. मनुके, पिस्ता घालायचे. 

• सुकं खोबरं किसून तेही त्यात घालावं. चांगली शिजली, गूळ मुरला की गॅस बंद करावा.


(या खिरीत खरंतर दूध घालत नाहीत. पण घालायचे असल्यास खीर थोडी कोमट झाल्यावर त्यात कोमटच दूध घालावे. गरम खिरीत ते घातल्यास गुळामुळे फुटू शकतं. पूर्ण खीर खराब होऊ शकते.)  

Wednesday, October 20, 2021

Chili Chicken 🍛




Chili Chicken 

बुधवारची मेजवाणी म्हणून थोड हल्क-फुल्क स्नॅक खाण्याची जीभेची इच्छा झाली. बुधवार म्हंटल तर आमचा नाॅनवेजचा वार. मग झटपट स्नॅक करायचं काय? हा प्रश्न पडला. ......मग हा बेत ठरला, चिली चिकनचा. वेळ न घालवता बनवायला घेवूया फटाफट....चला तर मग रेसीपी पाहूयात.

चिली चिकन

साहित्य :

१/२ कि. बोनलेस चिकन, २ चमचे आलं, २ चमचे लसूण (आलं- लसूण अगदी बारीक चिरून घ्यावे), २ हिरवी मिरची, १ चमचा काश्मिरी लाल मिर्च पावडर, १/२ चमचा ब्लॅक पेपर पावडर, १ अंडे, २ चमचे मैदा, ३ चमचे काॅर्न फ्लोअर, २ कांदे, २ सिमला मिरची ( कांदा व सिमला मिरची चौकोनी आकारामध्ये कापून घ्यावे ), २ चमचे टोमॅटो सॉस, २ चमचे सोया सॉस, १ चमचा व्हिनेगर, कॉर्नफ्लोअर, तळण्यासाठी तेल, मीठ, चिमूटभर साखर, कांदा पात किंवा कोथंबीर सजावटीसाठी 

कृती :

१) चिकनला ब्लॅक पेपर पावडर, मीठ, मैदा, काॅर्न फ्लोअर, अंडे घालून मिश्रण एकजीव करून १ तास मॅरीनेशनसाठी ठेवून द्यावे.

२) नंतर मॅरीनेशन केलेले चिकन तेलामध्ये High flame वर तळून घ्यावे.

३) आता एक पॅनमध्ये तेल गरम करून आलं- लसूण, हिरवी मिरची, सिमला मिर्ची व कांदा High flame वर फ्राय करून घ्यावे. 

४) त्यामध्ये चिकनचे पीसेस परतवून घ्यावे. 

५) आता सोया सॉस, टोमॅटो साॅस घाला व लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर घालून पॅनला टाॅस करा. (परतवून घ्यावे)

६) एका वाटीत थोडे पाणी घ्या, त्यात १/२ चमचा कॉर्नफ्लोर घाला व ते पाणी पॅन मध्ये टाका त्यामुळे ग्रेव्ही घट्ट होईल.

७) कोथंबीर अथवा कांदा पात वरून गार्निश करा. चिली चिकन तयार आहे.


Sunday, October 10, 2021

Veggie Spring Rolls

 


खूप दिवसांनी आपण पून्हा भेटत आहोत..... कोरोनाच्या परिस्थितिमधून विस्कटलेले जनजीवन पूर्ववत होत असताना, आता आमची ७.३५ ची फास्ट लोकल सुरू झाली.

आपल्या रोजच्या धावपळीतून थोडी उसंत घेवून परत जोमान आपला रूचिपर्णा ब्लॉग आपल्या लाडक्या खव्वयांपर्यंत पोहचवण्याचा अट्टहास तुमच्या खास आग्रहास्तव......

सुरुवात करूया तर.....

व्हेजिटेबल स्प्रींग रोल

साहित्य : 

२० स्प्रिंग रोल शीट्स, १/२ पातळ लांबट चीरलेला कोबी (जुलीयन), १/२ कप गाजराचे पातळ काप, १/४ कप पातीकांद्याचे पातळ काप, १/२ कप फरसबी पातळ तिरके काप, १ मध्यम सिमला मिरची पातळ उभे काप, १/२ कप शिजलेल्या नुडल्स, २ टीस्पून लसूण बारीक चिरून, १ टीस्पून आले बारीक चिरून, २ हिरवी मिरची बारीक चिरून, २ टीस्पून सोया सॉस, १ टेस्पून तेल, चिमूटभर अजिनोमोटो, १/४ टीस्पून मिरपूड, २ कप तेल स्प्रिंगरोल तळण्यासाठी, चवीपुरते मीठ


कृती:

१) कढईत १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात आलं लसूण, हिरवी मिरची परतावे. 

२) फरसबी, पाती कांदा, गाजर, आणि सिमला मिरची घालून मोठ्या आचेवर परतावे. 

३) सोय सॉस घालावा आणि मिक्स करावे.

४) नंतर मीठ, मिरपूड आणि कोबी घालून परतवून घ्यावे. ५) गॅस बंद करून नूडल्स घालून मिक्स करावे. 

६) सारण एका बोलमध्ये काढून ठेवावे.

७) एक स्प्रिंगरोल शीट घेउन त्याच्या एका कडेला १ चमचा सारण ठेवावे. २ वेळा रोल करून डावी आणि उजवी बाजू आत फोल्ड करावी.

८) रोल करून त्याच्या कडा (मैदा+पाणी पेस्ट करावी) पेस्टने चिकटवून टाकावे.

९) अशाप्रकारे सर्व स्प्रिंग रोल बनवावे. तेल गरम करून मध्यम आचेवर रोल तळावेत.

१०) स्प्रिंग रोल्स गरमच चिली सॉस बरोबर सर्व्ह करावे.