Saturday, May 9, 2020

Bread Swiss Roll

 
                   Eat Better Not Less 

     बरेच दिवस आपण अगदी झणझणीत, चमचमीत, तोंडाला पाणी आणणारे पदार्थ केले. पण आपल्या सोबत बरेच जण आपल्या खाण्यापिण्याच्या बाबतीत खुप हेल्थ कॉन्शस असतील ना? त्यांचा योगा, डायट, हलका-फुलका आहार, कॅलरीज, प्रोटिन्स आणि बरंच काही. त्यांच्या साठी सुद्धा काही तरी करुयात.
     तसे माझ्या लिस्ट मध्ये भरपूर मेन्यू आहेतच की. मग आजचा मेनू अगदी हलका-फुलका असा ब्रेकफास्टसाठी बनवूया. ज्यातून दिवसाची सुरुवात एकदम फिट होईल.

ब्रेड स्विस रोल :




साहित्य :
ब्रेड, तीळ, काकडी, कांदा, गाजर, कोबीची पान, केचअप, मेयाॅनीज, द्राक्षं (आवडत असलेली कोणतीही सिझनल फळं), ड्राय फ्रूट (आवश्यक असल्यास)

कृती :
१) ब्रेडचे काट काढायचे असल्यास काढा नाही तर तसेच ठेवले तरी चालेल.
२) मेयाॅनीज आणि केचअप मिक्स करुन घ्या.
३) काकडी, गाजर, कांदा, कोबीची पानं बारीक चिरून घ्या, द्राक्षं कट करून घ्या, आणि मेयाॅनीज आणि केचअपच्या मिश्रणात एकत्र करून घ्या. ड्राय फ्रूट सुद्धा बारीक कापून घ्या.
४) आता पोळपाटावर तिळ पसरवा व त्यावर ब्रेडला हलक्या हाताने लाटण्याने लाटा.
५) ब्रेडच्या एका बाजूला सॅलडचे मिश्रण घेवून त्याचा रोल करून खायला द्या.

                   

     आपल्याला ओरीजिनल रेसिपींच्या डिटेल्स तर सोशल मीडियावर मिळतातच, पण 'रुचीपर्णा' या ब्लॉगद्वारे त्या      रेसीपींना नेहमीच इनोव्हेटिव्ह आणि थोडे ट्विस्ट वापरून
बनवलेले पाहायला मिळतील. आपल्याला माहीत नसलेली त्या रेसिपींची थोडक्यात माहिती व स्वरुप देखील मिळेल. त्यासाठी कनेक्टेड राहा 'रूचीपर्णा' ब्लाॅगसोबत. 


3 comments:

  1. Mast Anni chhan kahitari vagali healthy recipe good job Aparana nakki try karate hya lockdown madhe

    ReplyDelete
  2. Tasty and healthy snacks .👌😋,🥪🥪

    ReplyDelete