सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्टची धुमाकूळ सुरू आहे. एक नवीन ट्रेंड सुरू झालाय जणू. सर्वजण आपल्या कलागुणांना वाव देत आहेत. कोणी योगा करताना दिसत आहेत तर कोणी पेंटिंग, स्केच, नृत्य, तर कोणी कुकिंग......
कॅटरीना कैफ, शिल्पा शेट्टी यांनी सोशल मीडियावर कुकिंग करतानाच्या पोस्ट शेअर केल्याच, पण आता सगळ्या घराघरांतून नवीन शेफ बनत आहेत जणू, आज कोणी एक रेसिपी तर उद्या कोणी दुसरी, सर्वसामान्य लोकांपासून ते सर्व डेलीसोप सेलिब्रिटी सुद्धा काही ना काही नवीन रेसिपी बनवताना सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
माझ्या देखील रेसिपींची अधिक भर, पण खरं तर तुम्हा सर्वांचे आभार मानायचे आहेत, की तुम्ही सगळे माझ्या रेसिपी वाचून त्याला प्रतिसाद देऊन माझे प्रोत्साहन वाढवीत आहात.
बरेच जण वेगवेगळ्या रेसिपींची मागणी करीत आहेत. माझ्या वाचकांनी मला मोमोज, केक, मिसळ, पेस्ट्रीज केक, बिर्याणी आणि बर्याच रेसिपींची मागणी केली आहे. हळूहळू मी सर्व रेसिपी तुमच्यापर्यंत पोहचवेन. तुमची प्रतिक्रिया व तुमचा माझ्यावरील विश्वास, माझा आत्मविश्वास वाढवत आहे.
माझ्या वाचकांखातर आणि 'मदर्स डे' स्पेशल सर्व मातांसाठी आजची रेसिपी करणार आहोत, बर्याच जणांचा आग्रह आहे की, आम्हाला पेस्ट्री केक शिकायचा आहे. कमी खर्चात आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने आज आपण करणार आहोत पेस्ट्री केक.
केक :
साहित्य :
मैदा, दुध, साखर, बेकिंग पावडर, सोडा, जायफळ पावडर,
तेल, इसेन्स, इ.
कृती :
१) मैदा, बेकिंग पावडर आणि सोडा एकत्र करून २/३ वेळा चाळून घ्यावा.
२) मिक्सर मध्ये दुध आणि साखर पहिल्या बटनवरच फिरवून घ्यावे.
३) आता मैदा तीन विभागात वेगळा करून हळूहळू मिक्सरमध्ये घालून फिरवून घ्यावा.
४) तेल आणि जायफळ पावडर घालून एकदा परत फिरवून घ्या (इसेन्स पाहिजे असल्यास घाला) आणि केकचे बॅटर करून घ्यावे.
५) एका भांड्याला तेल लावून हे केकचे मिश्रण ओतून मंद गॅसवर कुकरमध्ये १५/२० मिनिटे ठेवून केक बनवून घ्यावा.
(टिप : कुकर मध्ये केक करत असताना कूकरचे एक भांडे उपडे ठेवून त्यावर केकचे बॅटर असलेले भांडे ठेवावे. कुकरची वायर काढावी, शिटी असू द्या.)
पेस्ट्री केक
१) तयार झालेल्या केकचे तीन भाग करून घ्या.
२) चॉकलेट सॉसची रेसिपी मागच्या एका ब्लॉगमध्ये दिली आहे तसा चॉकलेट सॉस बनवून घ्या.
३) वीप क्रिम (बाजारात उपलब्ध असते) फेटून घ्या. आणि त्यामध्ये १ टी स्पून वेनीला इसेन्स घालून चांगले फेटून घ्या व फ्रिज मध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या.
४) साखर ४ चमचे घेऊन त्यात ६/७ चमचे पाणी घालून शुगर सिरप करून घ्या. ( त्याऐवजी कोणताही फ्रूट ज्यूस सुद्धा वापरु शकता.)
५) केक संपूर्ण थंड झाल्यावर त्याचे तीन भाग करून, प्रत्येक केकच्या एका लेअरवर हा शुगर सिरप थोडा थोडा पसरवून घ्या.
६) आता एका केकच्या लेअरवर थंड वीप क्रिम पसरवून, त्यावर दुसरा केकचा लेअर ठेवून परत वीप क्रिम पसरवून घ्या आणि शेवटच्या केक लेअरवर सुद्धा सेम कृती करा. असे तीन भागात कापलेल्या केकच्या लेअरला व्यवस्थित क्रिमने शेप देवून सेट करावे.
७) हा क्रिम लावलेला केक फ्रिज मध्ये १ ते २ तास थंड होण्यासाठी ठेवून द्या.
८) तयार झालेल्या केकवर चॉकलेट सॉस पसरवून आता तो परत सेट होण्याकरिता ठेवा.
९) पार्टीसाठी केक तयार आहे.
थांबा थांबा केक कापायची इतकी काय घाई करताय, आईला येवु द्या, तिच्या शिवाय आजचा दिवस साजरा कसा होणार.
Happy Mother's Day
Sundar
ReplyDelete😋😋😋😋👌👌👌
ReplyDeleteLovely Cartoon Cakes for kids 🎂🍰🎉🎉
ReplyDelete