आज आपल्या सोबत आपल्या छोट्या मुलांना काय खाऊ द्यावा हा वारंवार पडणारा प्रश्न, म्हणून आज छोट्यांची फर्माईश. त्यांना मधल्या वेळेत काही तरी खाऊ हवाच असतो. मग त्यांचे हट्ट पुरवण्यासाठी केलेली झटपट रेसिपी........ आलू चीझ कॉर्न पॅटिस ऐन्ड बॉल्स
आलू चीझ कॉर्न पॅटिस ऐन्ड बॉल्स
साहित्य :
मक्याचे दाणे १ वाटी, २ बटाटे, २/३ हिरव्या मिरच्या, (छोटा तुकडा) आलं, लसून ४/५ पाकळ्या, १/२ चमचा जिरे पावडर, १/२ लाल तिखट मिरची पावडर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, २/३ चमचे कॉर्न फ्लोअर, १ वाटी ब्रेड क्रम्स, १ ब्रेड स्लाइस ६/७ क्युब चीझ, तेल ( तळण्यासाठी )
कृती :
१) मिक्सर मध्ये मक्याचे दाणे-मिरची-आलं-लसूण एकत्र घेऊन पाणी न घालता मध्यम वाटावे.
२) बटाटे उकडून सोलून ते मॅश करुन घ्यावे. त्यामध्ये मीठ, हळद, जीरा पावडर, लाल तिखट मिरची पावडर, ब्रेड स्लाइस, कॉर्न फ्लोअर हे सर्व घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
३) त्यामध्ये मिक्सर मधून काढलेले वाटण घालावे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
४) आता या मिश्रणाचे दोन चमचे बॅटर हातावर घेऊन त्याच्या मध्ये चीझ क्युब घालून त्याला पॅटिस सारखा आकार देऊन ते ब्रेड क्रम्समध्ये घोळवून मंद आचेवर शॅलो फ्राय करावे.
५) किंवा काही मिश्रणाचे छोटे छोटे गोल बॉल करून ब्रेड क्रम्समध्ये घोळवून तेलामध्ये (डीप फ्राय) तळून घ्यावे.
मुलांना आता नेक्स्ट टाईम सुद्धा असाच काही तरी मस्त खाऊ हवा आहे, त्यांनी तर आधीच ठरवून टाकलं की काय करायचे............ पण ती रेसिपी तुमच्यासाठी मी नंतर घेऊन येईन.
Awesome👌👌👌
ReplyDeleteChan mast
ReplyDeleteThe best we have , the delicious u serve
ReplyDeleteCheeseee#### Soft#####Nice.
ReplyDelete