गणपती बाप्पा विशेष रेसिपी
गव्हाची खीर
साहित्य:
• १०० ग्रॅम खपली गहू (हे गहू खिरीचे म्हणून वेगळे असतात. ते थोडे महागही असतात. मुंबईत ते मिळत नाहीत. )
• ५० ग्रॅम गूळ, भाजकी खिरीची शेव, चार पाच चमचे तूप
• सुक्या किंवा ओल्या खोबर्याचा तुकडा, (मी ओल्या खोबर्याचा तुकडा वापरते),
• सुंठ, वेलची, मनुके, काजू, बदाम, पिस्ता चारोळे
(मुले खिरीमध्ये ड्रायफ्रूट असतील तर जास्त आवडीने खातात.)
कृती:
• खपली गहू आदल्या रात्री नीट धुवून भिजत ठेवावेत.
• सकाळी कुकरला चांगल्या तीन-चार शिट्ट्या काढून शिजवून घ्यावेत. (हे गहू कडक असतात. त्यामुळे शिजायला वेळ लागतो. )
• कुकर उघडून त्यातच किंवा साहित्य दुसर्या भांड्यात घेऊन त्यात गूळ घालावा. हा गूळ चांगला घोटवून घ्यावा.
• सुंठ व वेलची पावडर करून घालावी.
• ओला नारळचे बारीक काप आणि काजू, बदाम तुपात गुलाबी रंगावर तळून घ्यावेत.
• बारीक शेवाळया सुद्धा तुपात भाजून घ्याव्या. मनुके, पिस्ता घालायचे.
• सुकं खोबरं किसून तेही त्यात घालावं. चांगली शिजली, गूळ मुरला की गॅस बंद करावा.
(या खिरीत खरंतर दूध घालत नाहीत. पण घालायचे असल्यास खीर थोडी कोमट झाल्यावर त्यात कोमटच दूध घालावे. गरम खिरीत ते घातल्यास गुळामुळे फुटू शकतं. पूर्ण खीर खराब होऊ शकते.)

No comments:
Post a Comment