आज खूपच दिवसांनी 'रूचीपर्णा', आपल्या सर्वांनसाठी पुन्हा एकदा नवनवीन रेसिपी घेऊन येत आहे.
कोरोना बद्दल आपण खुप बोलत असलो तरी, ती वेळ प्रत्यक्ष आपण अनुभव आल्यानंतरच कळते. असो आपण परत आपल्या रूचीपर्णा किचन कडे वळूया.
थोडी फार हलकीशी थंडी जाणवू लागली आहे, म्हणून विचार केला की आता काही थंडीसाठी गरमागरम आणि हेल्दी अशा रेसिपीने सुरवात करुयात.. ...
चला तर मग आज आपल्या किचनमध्ये हेल्दी आणि झटपट अशी रेसिपी बनवायला.
*मखाना खीर*
* साहित्य *
२ कप मखाना
२ कप दुध
१/२ कप साखर
२ टेबल स्पून तूप
२ टेबल स्पून सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ता, चारोळी)
५/६ काड्या केशर
* कृती *
१) गॅसवर एका पॅन मध्ये दोन टेबल स्पून तूप घेऊन ते गरम झाल्यावर त्यात मखाने पाच मिनिट मध्यम आचेवर परतून घ्या.
२) सुका मेवा पॅन मध्ये तुपावर मध्यम आचेवर परतून घ्या.
३) परतलेले मखान्यातील निम्मे मखाने मिक्सर मधून चुरा करून घ्या.
४) गॅसवर पॅनमध्ये दुध गरम करायला ठेवा. दुधाला उकळी आल्यावर त्यात चुरा केलेले मखाने व आख्खे मखाने घालून दहा मिनिट सारखे ढवळत रहा.
५) त्यात साखर घाला. सुका मेवा व केशर घालून सर्व एकत्र करून दहा मिनिट ढवळत रहा. मखाना खीर तयार

Healthy recipes. Excellent
ReplyDeleteझक्कास
ReplyDelete