आपल्या चिभेचे चोचले आपण पुरवण्यासाठी आपण सतत काही ना काही नवीन रेसिपी बनवण्याच्या प्रयत्नात असतो. खवय्ये म्हंटलं तर ते साहजिकच आहे.
आपण आतापर्यंत खूप चमचमीत पदार्थ केले आजचा मेन्यू सुद्धा खमंग आहे. खमंग म्हणण्याच कारण म्हणजे आज आपण चहाच्या वेळात खाऊ साठी हलकाफुलका रवा ढोकळा बनवणार आहोत.
बेसण ढोकळा आपण नेहमीच खात असतो, बाजारातून आणुन किंवा घरीच बनवून. पण रवा ढोकळा कसा पर्फेक्ट बणवायचा यासाठी आज आपण 'रूचीपर्णा' वर पाहणार आहोत झटपट 'स्पाँजी रवा ढोकळा'
'स्पाँजी रवा ढोकळा'
साहित्य :
१ वाटी रवा, १ वाटी दही, १/२ (टि. स्पून) चमचा खायचा सोडा, १/२ पॅकेट इनो, १ चमचा साखर, १/२ चमचा खायचे तेल, चवीनुसार मीठ
कृती :
१) प्रथम दही फेटून त्यात रवा घालून १/२ तास भिजत ठेवून ध्यावे.
२) रवा चांगला भीजवून त्यामध्ये मीठ आणि खायचा सोडा घालून चांगले फेटून १० मिनिटे ठेवून ध्यावे.
३) त्या मिश्रणात साखर व तेल घालून एकजीव करून घ्यावे.
४) आता या स्टेपला ईनो घालून पटकन मिश्रण फेटून ते लगेचच तेल लावून घेतलेल्या ईडली पात्रामध्ये भरून १५/२० मिनिटे वाफवण्यासाठी ठेवून ध्यावे.
५) तयार ढोकळा थंड झाल्यावर त्याचे पीसेस करून त्यामध्ये लाल मिरची पावडर किंवा चाट मसाला घालावा.
६) वरतून फोडणीसाठी तेल गरम करुन त्यात जिरं, मोहरी, कडीपत्ता व १/२ वाटी पाणी घालून थोडी साखर घालून ते मिश्रण तयार ढोकळ्यावर ओतून ५ मिनिटे ठेवून नंतर सर्व्ह करा.
# टिप : स्पाँजी ढोकळा तयार करण्यासाठी साहित्य अचूक घेणे आवश्यक आहे.

Mam....Khup mast
ReplyDeleteRealy yemee and simply
ReplyDeleteRealy yamee and simply
ReplyDeleteMast....😋😋😋😋
ReplyDeleteखमंग खूप
ReplyDelete