साम टिव्हीच्या एका एपिसोड मध्ये ही रेसिपी मी केली आहे. आज खास तुमच्यासाठी बनवणार आहोत, नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारात, स्काॅच एग्ज......
खरतर याची रेसिपी आम्ही आमच्या 'बेकिंग अँड कन्फेशनरी' च्या क्लासेसमध्ये अमित महिंद्रकर सरांकडून शिकले.
स्काॅच एग्ज
साहित्य :
५ अंडी, चिकन खिमा पाव किलो, २ कांदे, १ चमचा आलं - १ चमचा लसूण, २/३ हिरवी मिरची (बारीक चिरून), १ चमचा मिक्स हर्ब, १/२ चमचा ब्लॅक पेपर पावडर, १/२ चमचा मस्टर मेयॉनीज, २ चमचे मैदा, १ वाटी ब्रेड क्रम्स, पार्स्ले/ कोथिंबीर, मीठ, तळण्यासाठी तेल
कृती :
१) प्रथम ४ अंडी उकडून घ्यावी.
२) चिकन खिमा घेऊन त्यामध्ये कांदे, आलं, लसूण, हिरवी मिरची, मिक्स हर्ब, ब्लॅक पेपर पावडर, मस्टर मेयॉनीज, पार्स्ले किंवा कोथिंबीर, व मीठ घालून एकजीव करून घ्यावे.
३) उकडलेली अंडी थंड झाल्यावर कवच काढून थंड करून घ्यावीत.
४) १ अंडे फेटून घ्यावे.
५) १ उकडलेले अंडे मैद्यामध्ये घोळवून घ्यावे. ( मैद्यामध्ये थोडं मीठ व ब्लॅक पेपर पावडर मिसळून घ्यावी.)
६) मैद्यामध्ये घोळवलेले अंडे फेटलेल्या अंड्यामध्ये घोळवून परत एकदा मैद्यामध्ये घोळवून घ्या.
७) आता हाताला थोडं तेल लावून चिकन खिमाची एक गोळी घ्यावी व ती लाटून घ्यावी.
८) लाटलेल्या चिकन खिमामध्ये अंडे मधोमध ठेवून त्याचा अंड्याच्या आकाराच्या शेपमध्ये गोळा करून घ्यावे.
९) हे स्काॅच एग्ज फेेटलेल्या अंड्ययामध्ये बुडवून, ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यावे.
१०) तयार केलेले स्काॅच एग्ज तळून घ्यावे. व खाण्यासाठी एखाद्या डिपसोबत द्यावे.
स्काॅच एग्ज
नेहमीच्या रेसिपीपेक्षा थोडे काहीतरी वेगळं करायला काहीच हरकत नाही.





Nice Very Good
ReplyDeleteSupperrrr dish
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDelete