रोज रोज नाश्ता काय करायचा हा एक प्रश्नच आहे. आणि जर का घरात लहान मुले असतील तर खूपच अवघड प्रश्न होवून बसतो. आपण रोज एक एक रेसिपी म्हणजे कांदापोहे, उपमा, डोसे, इडली पासून ते मॅगी, पास्ता इथपर्यंत सर्व काही बनवतो. तरी या मुलांना काही तरी वेगळ हव असत, म्हणून थोडा झटपट ट्विस्ट....
ब्रेकफास्टसाठी थोडी हटके रेसिपी जी मुलांना खूपच आवडेल आणि मुलंच काय तर आपण देखील आवडीने खाऊ शकतो.
चिली रवा अप्पम / Chilli Rava Appam
अप्पम साहित्य :
२ वाटी रवा, २ कांदे, १ टोमॅटो, २ चमचे दही, ३/४ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चिमूटभर खायचा सोडा, मीठ
कृती :
१) रवा स्वच्छ करून तो भिजवून घ्यावा.
२) त्यातील पाणी काढून, त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ व खायचा सोडा घालून १५ ते २० मिनिटे झाकून ठेवावे.
३) २० मिनीटानंतर बॅटर चांगले फेटून आप्पे पात्रामधून अप्पम बनवून घ्यावे.
चिली ग्रेव्ही
साहित्य :
१ सिमला मिरची (बारीक चिरून), २ कांदे (बारीक चिरून), २ चमचे टोमॅटो केचअप, २ चमचे सोया सॉस, १ कांदा पात, १ गाजर, १०/१२ लसूण पाकळ्या, १ चमचा कॉर्न फ्लोअर, २ चमचे तेल (लाॅकडाउनमुळे कांदा पात व गाजर मिळाले नाही. तुम्हाला मिळाल्यास वापरू शकता.)
कृती :
१) तेल गरम करून कांदा परतवून घ्या.
२) आता सिमला मिरची परतवून घ्या. (गाजर असल्यास ते देखील परतवून घ्या.)
३) लसूण बारीक चिरून त्यामध्ये परतवून घ्या.
४) आता टोमॅटो केचअप व सोया सॉस घालून परतवून घ्या.
५) १/२ ग्लास पाणी घालून मिश्रण हलवत रहा.
६) कॉर्न फ्लोअर मध्ये पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून ती वरील ग्रेव्हीमध्ये घालून मिश्रण सतत ढवळत रहावे.
७) तयार ग्रेव्हीमध्ये अप्पम घालून ते एकत्र मिक्स करुन घ्यावे व ब्रेकफास्टसाठी वरतून कांदा पात घालून गरमा गरम सर्व्ह करावे.
(खाली संपूर्ण रेसिपीचा व्हिडिओ दिलेला आहे.)
नुसते अप्पम-चटणी मुलांना दिली तर ते नाक मुरडतात, म्हणूनच थोडा चायनीज टचचा ट्विस्ट !
Supperrrr
ReplyDeleteWa mastach kahiteri navin
ReplyDeleteYummy
ReplyDelete