सध्याच्या परिस्थितीत घरात जे उपलब्ध साहित्य आहे त्यातून बनवता येईल आणि झटपट सोप्या अशा रेसिपी करता येईल अशा रेसिपी पाठवा, असे बरेच मॅसेज मला यायला लागले. त्यातच बर्याच लोकांचे वाढदिवस, तर काहींच्या लग्नाचे वाढदिवस असल्याने विविध केकच्या तर रेसिपींची फर्माईश सुरूच आहे. व्हिट केक, चॉकलेट केक आणि बरेच केक आपले तसे झालेत पण रवा केकची रेसिपी वाचकांनी मागितली असून आज रवा केक करुयात.
साहित्य :
१ वाटी रवा, दिड वाटी दूध, १/२ वाटी साखर, ५/६ चमचे तेल/ तूप, १ चमचा बेकिंग पावडर, २ चिमूट सोडा, १/२ चमचा वेलची पावडर
कृती :
१) प्रथम रवा मिक्सर मधून एकदा फिरवून घ्यावा.
२) एका बाउलमध्ये दूध आणि साखर मिक्स करुन त्यामध्ये तेल घालून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे.
३) आता रवा चाळून दुधाच्या मिश्रणात घालून चांगले फेटून घ्यावे व सोडा घालून मिश्रण परत एकदा फेटून १/२ तास झाकून ठेवावे.
४) नंतर मिश्रणात बेकिंग पावडर व वेलची पावडर घालून एकजीव करून बॅटर तयार करून घ्यावे.( गरज लागल्यास थोडे दूध घालावे)
५) केक टिन मध्ये बॅटर घालून रवा केक ओव्हन मध्ये १८० तापमानवर २० मिनिटे बेक करून घ्यावे.
६) कुकर मध्ये बनवायचे असल्यास कुकरमध्ये एक भांडे उपडे ठेवून त्यावर केकचे बॅटर असलेले भांडे ठेवून कुकरची वायर न घालता मध्यम आचेवर २०/२५ मिनिटे केक बेक करून घ्यावा.
आजपासून अय्यंगार बेकरीमधून रवा केक आणायची गरजच नाही. घरच्या घरी अय्यंगार बेकरीच्या रवा केकचा आस्वाद घ्या.
Chan👌👌👌👌
ReplyDeleteChanch 👌👌👌
ReplyDelete