आज घरीच पनीर बनवल होतं, रोज रोज कडधान्य खाऊन सुद्धा कंटाळा आला सर्वांना. म्हणून आखला बेत पनीरच्या रेसिपीचा. पनीर मखणी, पनीर कढाई बर्याच वेळा बनवून झालेलं होतं, म्हणून आज जरा वेगळी पनीर रेसिपी करायचा विचार केला.
मग काय सुचल ना, अगदी नवीन आणि मस्त अशी पनीर सँडविच मसाला रेसिपी........ चला तर मग सुरु करूयात तयारी..........
पनीर सँडविच मसाला
साहित्य :
५०० ग्रॅम पनीर, ४ चमचे आलं-लसूण-मिरची पेस्ट, ४ चमचे पुदिना आणि कोथिंबीर पेस्ट, ५/६ चमचे काजू-मगज पेस्ट, २ मध्यम कांदे, २ टोमॅटो, २ चमचे पनीर मसाला, २ चमचे लाल मिरची पावडर, कॉर्न फ्लोअर, १ चमचा साखर, मीठ, तेल
कृती :
१) २ चमचे आलं-लसूण-मिरची पेस्ट आणि २ चमचे पुदिना आणि कोथिंबीर पेस्ट पाणी न घालता थोडं मीठ घालून एकत्र करून हिरवा मसाला बनवून घ्यावे.
२) पनीरचे मोठे चौकोनी तुकडे करून घ्यावे, व दोन पनीरच्या तुकड्यांमध्ये हा हिरवा मसाला घालून कॉर्न फ्लोअर मध्ये घोळवून घ्यावे.
३) तयार पनीरचे सँडविच तेलात तळून घ्यावे.
ग्रेव्हीसाठी :
१) २ चमचे तूप गरम करून त्यामध्ये २ चमचे आलं-लसूण-मिरची पेस्ट घालून परतवून घ्या.
२) आता कांदा व टोमॅटोची प्युरी करून तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.
३) ५/६ चमचे काजू-मगज पेस्ट, २ चमचे पुदिना आणि कोथिंबीर पेस्ट घालून परतवून घ्यावे.
४) आता त्यामध्ये पनीर मसाला, लाल मिरची घालून चांगले परतून त्यामध्ये साखर घालून चवीनुसार मीठ व १/२ वाटी पाणी घालून ग्रेव्ही तयार करून घ्यावे.
५) ग्रेव्ही चांगली शिजवून घ्यावी व त्यामध्ये पनीरचे सँडविच परतवून घ्यावे.
.....................गरमागरम रोटी वा नान सोबत खायला द्यावे.
Nice
ReplyDeleteAwesome...
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteKhup chan recipe ,bharich g
ReplyDeleteYummy panner dish.
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteसगळ्या रेसिपी छान आणी सोप्या आहेत
ReplyDelete