आज रविवार, मग तुमचा नक्कीच नॉनव्हेज जेवणाचा बेत असणार. चिकन, मटण सारख्या मांसाहारवर ताव मारणार. त्यात देखील व्हरायटी असेलच, बटर चिकन, चिकन ६५, चिकन तंदूरी, लॉलीपॉप वगैरे......
आपण तर चिकन ६५, चिली चिकन सारखे सारखे बनवतच असतो, पण मी आज तुमच्यासाठी अगदी वेगळ्या पद्धतीची आणि छकास अशी टेस्टी रेसिपी घेऊन आले.
गार्लिक चिझ चिकन
साहित्य :
२ चिकन ब्रेस्ट ( बोनलेस चिकनचा भाग), ४/५ क्यूब चीझ, १ चमचा ओरेगॅनो, १/२ चमचा मीठ, ६/७ लसूण पाकळ्या, १/२ चमचा ब्लॅक पेपर पावडर, १ चमचा लिंबू रस, १ अंड, ४ चमचे कॉर्न फ्लोअर, ब्रेड क्रम्स, तळण्यासाठी तेल
कृती :
१) चिकन स्वच्छ धुवून त्याचे लांबट असे पिसेस कट करून घ्या.
२) त्याला मीठ, लिंबू रस, आणि ब्लॅक पेपर पावडर लावून १/२ तास मॅरीनेट करण्यासाठी ठेवावे.
३) एक अंड फेटून त्यामध्ये थोडं मीठ, कॉर्न फ्लोअर, बारीक चिरलेला लसूण, ओरेगॅनो, आणि चीझ घालून फेटून बॅटर बनवून घ्यावे.
४) मॅरीनेट केलेले चिकनचे पिसेस तयार बॅटरमध्ये घोळवून परत १/२ तास फ्रिजमध्ये मॅरीनेट करायला ठेवावे.
५) फ्रेश ब्रेडच्या दोन स्लाइस मिक्सरमध्ये टाकून त्याचे ब्रेड क्रम्स बनवून घ्यावे.
६) मॅरीनेट केलेले चिकन पिसेस ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून मंद गॅसवर तेलामध्ये तळून घ्यावे, सॉस किंवा पुदिना चटणी बरोबर खाण्यासाठी तयार आहे आपले चिझी चिझी गार्लिक चिकन.
नेहमी त्याच त्याच रेसिपी करण्यापेक्षा थोडं वेगळं ट्राय करायला काय हरकत आहे.
Crispy Fried Chicken Just like any KFC or McDonald recipes
ReplyDeleteमस्त मी नक्की try करणार..👍👍👍
ReplyDeleteInteresting
ReplyDeleteNice
ReplyDelete👌👌👌
ReplyDeletewow mi nakki try karen he
ReplyDelete