आम के मौसम मे आम नही?
फळांचा राजा तो आणि वर्षातून एकदाच मिळतो, चाखला नाही तर वर्षे असेच फुकट जाणार.
तुम्हाला नाही मिळाले का आंबे? मी तर आणले आणि खूप प्रकारच्या रेसिपी सुद्धा केल्या. नाही तुमच्या दुःखावर मीठ नाही टाकत.
असो दरवर्षी आम्ही आंब्यांची वाट पहात असतो. तसे, यावर्षी देखील मला आंबे मिळाले. मी याचे डिटेल्स तुम्हाला आज नाही देणार, कारण आंबा हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे.
तुमच्या लक्षात आलेच असेल की, आपण काहीतरी आंब्याची रेसिपी बनवणार आहोत. काहीतरी कशाला आपण मँगो मस्तानीच बनवूयात.
मँगो मस्तानी :
नावातच सर्व आहे, पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या मँगो मस्तानीला इतिहासदेखील आहे. बाजीराव - मस्तानीच्या काळात यामध्ये अंडी वापरून बनवले जायचे. परंतु आता मँगो मस्तानी ही ताज्या फळांपासून बनवली जाते आणि यामध्ये अनेक प्रकार पहायला मिळतात जसे की, वेनीला मस्तानी, आँरेंज मस्तानी, पिस्ता मस्तानी, सीताफळ मस्तानी, गुलाब मस्तानी इ.
साहित्य :
हापूस आंबा गर २ कप, दूध २ कप ( फॅट मिल्क चालेल), ४ कप आईस्क्रीम, साखर २/३ चमचे, ५/६ बदाम, ५/६ पिस्ता, १०/१२ ग्लेझ्ड चेरी, रोझ सिरप २ चमचे, सब्जा बी २ चमचे.
कृती :
१) प्रथम बदाम, पिस्ता बारीक कापून घ्या, सज्ज पाण्यात भिजवून ठेवा.
२) थोड्या आंब्याचे चौकोनी तुकडे करून ठेवा.
३) आंब्याचा गर काढून मिक्सरमध्ये घ्या, (यातील १/२ चमचे बाजूला काढून ठेवा, ग्लासमध्ये सेट करण्यासाठी) दोन चमचे साखर आणि थंड दूध घालून मिक्सरमधून फिरवून घ्या.
४) याच मिश्रणात २ कप आईस्क्रीम घालून परत मिक्सर मधुन फिरवून घ्या.
५) मँगो शेक तयार करून आता ते ग्लासमध्ये सेट करून घ्यावे.
६) एका काचेच्या ग्लासमध्ये पहिला रोझ सिरप १ चमचा घालून त्यावर साधा आंब्याचा गर घालावा. आता १ चमचा सब्जा घालावे.
७) त्यावर एक ते दिड कप मँगो शेक घालावे आणि आईस्क्रीम स्कूप घालून वरतून बदाम, पिस्ते, रोज सिरप, ग्लेझ्ड चेरी घालून खाण्यासाठी तयार मँगो मस्तानी द्यावे.
मस्त मस्त मस्तानीचा आस्वाद घ्या घरच्या घरी, त्यासाठी पुण्यातील सदाशिव पेठेत जायची गरज नाही.
Ekdum mast mango mastani
ReplyDeleteMango 🥭 Masti 🥭Masti🥭🥭🥭 🥭🥭🥭🥭
ReplyDeleteMast mast mastani
ReplyDeleteNice one...
ReplyDelete👌👌👌👌
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteSuper cool 👌👌🍹🍹
ReplyDelete