रूचीपर्णा
(पहिला प्रयत्न)
झटपट आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने करता येईल अशा पदार्थांची खवय्येगीरी सर्वांसाठी घेऊन येत आहे त्याचबरोबर,
मी तुम्हाला ओरीजिनल रेसिपी मध्ये माझ्या स्वतःच्या आयडिया घेऊन केलेल्या आणि काही माझ्या स्वतःच्या रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. चला तर पाहूया..........
कडक उन्हाळ्यात थंड सरबत, कोकम किंवा ऊसाच्या रसाची चव घेतली नाही तर तो उन्हाळा कसला, म्हणूनच तुमच्यासाठी विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची मेजवानी घेऊन येत आहे.
भारतीय पदार्थांमध्ये सरबतांचे अनेक प्रकार पहायला मिळतात. लिंबू सरबत, खस, आवळा, किंवा ताज्या फळांचे सरबत (यांच्या रेसिपी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या असून त्या देखील पुढील भागात देईन) इ. पण आज आपण थोड्या वेगळ्या प्रकारात मोडणारी सरबतं रिफ्रेशमेंट म्हणून पाहणार आहोत, ते म्हणजे 'माॅकटेल'.
माॅकटेल : Moctails
माॅकटेल हे एक नाॅन-अल्कोहोलिक ड्रिंक आहे. १९८० पासून पाश्चात्य देशांमध्ये समारंभात किंवा पार्ट्यांमध्ये कोल्ड- ड्रिंक्सची जागा या माॅकटेलनी घेतली आणि आज भारतात देखील विविध माॅकटेल्स प्रचलित झाली आहेत.
Virgin Mojito : 'वर्जीन मोयीतो' मूळात हा स्पॅनिश शब्द. इंग्रजी मध्ये लिहीताना Mojito असा लिहीला जाणारा शब्द मोयीतो असा बोलला जातो. पाहूयात साहित्य......
साहित्य :
पुदिन्याची पानं, लिंबू व लिंबाचा रस, सफरचंद, बर्फाचे तुकडे, बारीक साखर, सोडा बाॅटल, आवश्यक असल्यास मीठ
कृती :
एक ग्लास घेऊन त्यामध्ये पुदिन्याची पानं आणि लिंबूच्या दोन-तीन चकत्या, दोन चमचे साखर व चवीपुरते मीठ टाकून मडलरच्या (लाकडाचे खलबत्तासारखे असते) सहाय्याने एकजीव करून घ्यावे. ग्लासमध्ये तीन-चार बर्फाचे खडे टाकावे. एकजीव केलेल्या मिश्रणात एक ग्लास सोडावाॅटर आणि सफरचंदाचे एकदम बारीक केलेले तुकडे घालून चमच्याने ढवळून पिण्यासाठी द्या .
Watermelon Mojito :
साहित्य :
पुदिन्याची पानं, लिंबू व लिंबाचा रस, कलिंगड, बर्फाचे तुकडे, बारीक साखर, सोडा बाॅटल, Sprite आवश्यक असल्यास मीठ
कृती :
एक ग्लास घेऊन त्यामध्ये पुदिन्याची पानं, कलिंगडाचे काप, लिंबूच्या दोन-तीन चकत्या, दोन चमचे साखर व चवीपुरते मीठ टाकून मडलरच्या सहाय्याने एकजीव करून घ्यावे. ग्लासमध्ये तीन-चार बर्फाचे खडे टाकावे. एकजीव केलेल्या मिश्रणात अर्धा ग्लास सोडावाॅटर आणि Sprite softdrink घालून चमच्याने ढवळून झटपट पिण्यासाठी द्यावे.

अशा विविध फळांपासून आपण वेगवेगळे मोयीतो माॅकटेल्स बनवू शकतो. जसे की, ओरेंज मोयीतो, किवी मोयीतो, ब्लॅकबेरी मोयीतो, पायनॅपल मोयीतो, मँगो मोयीतो, स्ट्रॉबेरी मोयीतो इ......
मस्त
ReplyDeleteMastch 😋
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteखूप सुंदर छान
ReplyDeleteछान
ReplyDeleteBeautiful & Innovative Recipe from beautiful person
ReplyDeleteमस्त अपर्णा ताई 🔥♥️
ReplyDeleteOsm
ReplyDeleteVery cool and refreshing
ReplyDeleteWater melon mojito sounds great....
ReplyDeleteThanda thanda cool cool😋😋😋😋
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteSo yummy 😋 cool n refreshing gggg
ReplyDeleteGreat ! Superb
ReplyDelete
ReplyDeleteMast khupach chhan.bes luck. So yummy
ReplyDeleteMast khupach chhan.best luck. So yummy
छान आहे,आम्ही एकदा केले
ReplyDeleteला प्रयत्न, मस्त वाटतं.